Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Crop Damage : गारपिटीचा ज्वारीसह केळी, पपई, आंबा बागांना तडाखा

वादळी पावसासह गारपीट होऊन जिल्ह्यातील केळी, पपई, आंबा या फळपिकांसह उन्हाळी ज्वारीला तडाखा बसला आहे.

Team Agrowon

Nanded News : वादळी पावसासह गारपीट (Hailstorm) होऊन जिल्ह्यातील केळी, पपई, आंबा या फळपिकांसह उन्हाळी ज्वारीला तडाखा बसला आहे. याशिवाय वीज पडून सहा जनावरेही दगावली आहेत.

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास वादळी पाऊस झाला. अनेक भागांत गारपीट झाली. यामुळे केळी, आंबा, पपई या फळपिकांसह उन्हाळी ज्वारी फटका बसला. पावसाने लोहा, कंधार, नायगाव, नांदेड, अर्धापूर, मुदखेड तालुक्यांत पिकांना दणका (Crop Damage) दिला.

दरम्यान, कंधार तालुक्यातील लालवाडी शिवारात वीज पडून दादाराव बळिराम कुंभारगावे यांचा बैल, तर बिजेवाडी येथील दिगांबर बाबूराव लुंगारे यांची म्हैस मृत्युमुखी पडली. लोहा तालुक्यातीलही चार जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला.

जवळा येथील शेतकरी उत्तम एकनाथ शिखरे यांचा एक गोऱ्हा दगावला. तर शेवडी तांडा येथील बालाजी तुकाराम चव्हाण यांची गाय, हातनी येथील किशन व्यंकटराव उबाळे यांची एक गाय, पोखरभोशी येथील संदीप डांगे यांची म्हैस वीज पडून मृत्युमुखी पडली.

लोहाचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी याबाबत पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. जवळा (दे) येथील वीरू अमोल गोडबोले (वय ८) हा मुलगा घरावरील पत्रे उडून गंभीर जखमी झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT