Agnipath
Agnipath Agrowon
ताज्या बातम्या

'अग्निपथ' योजनेविरुद्ध देशव्यापी आंदोलनाची गरज: टिकैत

Team Agrowon

लष्कर भरतीसाठी केंद्र सरकारकडून 'अग्निपथ' योजना राबवण्यात येत आहे. देशभरात विविध ठिकाणी युवकांकडून या योजनेविरुद्ध निदर्शने सुरु आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही 'अग्निपथ' योजनेला विरोध केला आहे. या मुद्यावर देशव्यापी आंदोलन करण्याची गरज टिकैत यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या मुद्यावर देशात आणखी एक आंदोलन करण्याची गरज टिकैत यांनी व्यक्त केली. मात्र सध्या युवकांच्या लष्करभरतीचा मुद्दा महत्वपूर्ण असून त्याबाबत तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आजवर युवकांना भारतीय लष्करात १५ वर्षे सेवा बजावता येत होती. लष्करी सेवेतुन निवृत्त झाल्यावर त्यांना निवृत्ती वेतन दिले जात होते. मात्र आता या नव्या 'अग्निपथ' योजने अंतर्गत लष्करात सेवा बजावल्यानंतर निवृत्ती वेतन दिले जाणार नाही.

असेच लॉजिक लोकप्रतिनिधींनाही लागू करायला हवे, असे टिकैत म्हणाले. आमदार, खासदार वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत निवडणूक लढवू शकतात. त्यांना पेंशन लागू होते. मात्र लष्करात सेवेसाठी सज्ज युवकांना सेवेची केवळ ४ वर्षांचीच संधी मिळणे आणि त्यांनतर त्यांना निवृत्तीवेतन न मिळणे हा अन्याय आहे. आम्ही असे घडू देणार नसल्याचे टिकैत म्हणाले. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरुद्ध देशव्यापी आंदोलन करणार असल्याचेही टिकैत म्हणाले आहेत.

केंद्र सरकारकडून सध्या भारतीय संरक्षण दलात भरतीसाठी 'अग्निपथ' योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत १७.५ ते २२ वर्ष वयोगटातील ४६ हजार तरुणांना भारतीय नौदल, वायुदल, स्थलसेनेत सामावून घेण्यात येणार आहे. हे युवक संबंधित विभागात ४ वर्षांसाठी सेवा बजावणार आहेत. चार वर्षांची सेवा बजावल्यानंतर या युवकांना निवृत्ती वेतन दिले जाणार नाही. लष्करी सेवेतून निवृत्त होताना संबंधितांना निवृत्तीवेतन योजना देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT