Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

सुधारित बियाण्यांकडे देशाचे दुर्लक्ष ः पवार

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली ः कोरोना संकट आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia Ukraine war) संपूर्ण जगात अन्नसुरक्षेचा (Food Security) मुद्दा निर्णायक झाला असून, यात जनुकीय (Genetically Modified) बदलातून तयार केलेल्या सुधारित बियाण्यांच्या (Seed) वापराचे महत्त्व वाढले आहे. भारतात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली, तर परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी अन्नदात्या शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधण्यासाठी आता ऊर्जादाते व्हा, असे आवाहन केले. निमित्त होते, देशाच्या अन्नसुरक्षेचे जनक मानले जाणारे माजी कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृती शताब्दी व्याख्यानाचे.

दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्यातील माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान असताना अण्णासाहेब शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. त्या पार्श्‍वभूमीवर लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री हेदेखील विशेष निमंत्रित होते. पवार यांनी अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना सुधारित वाणाच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले.

पवार म्हणाले, ‘‘आता संकटानंतर जगभरात लोकांना या सुधारित बियाण्यांचे महत्त्व कळाले असून, विरोध करणारेही जनुकीय बदल केलेल्या वाणांना मान्यता देऊ लागले आहेत.’’ भारतात बीटी कॉटनच्या यशानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. गडकरी यांनी कृषी आणि ग्रामीण विकासात विज्ञान तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व सांगताना शेतकऱ्यांना आता ऊर्जा उत्पादनाकडे वळण्याचे आवाहन केले.

पुण्यात इथेनॉल रिक्षा

इंधन म्हणून इथेनॉलच्या वापराचा उल्लेख करताना गडकरी यांनी पुण्यात लवकरच इथेनॉल रिक्षा सुरू करणार असल्याचे सांगितले. पुण्याच्या परिसरात इथेनॉल तयार होत असताना पेट्रोल आणि डिझेल का वापरले जाते, असा सवाल गडकरी यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT