Cotton Rate Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Rate : खानदेशात कापूस दर दबावातच

खेडा खरेदीत दर प्रतिक्विंटल ७५०० ते ७८०० रुपये

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात कापूस दर (Cotton Rate) दबावातच आहेत. सध्या प्रति क्विंटल ७५०० ते ७८०० रुपये दर खेडा खरेदी (थेट गावातून किंवा जागेवरची खरेदी) मध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे.
मागील काही दिवसांत कापूस दर आणखी दबावात आले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. खानदेशात कापसाची आवकही (Cotton Arrival) स्थिर आहे.

सध्या प्रतिदिन पाच हजार गाठी (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक होत आहे. अर्थात रोज २५ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक वाढत नसल्याची स्थिती आहे. कारण दर परवडणारे नाहीत.

शेतकऱ्यांना किमान १० हजार रुपये दर हवा आहे. दरवाढ डिसेंबरनंतर झालेलीच नाही. दरात घसरण अधिक झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटलचा दर काही दिवस होता. जानेवारीतील दर कमाल ८२५० रुपये प्रति क्विंटल होता.

फेब्रुवारी व मार्च या महिन्यातील दर कमाल ८००० रुपये असाच राहिला आहे. किमान दर ७७०० रुपयांवरून ७५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.

दर्जेदार कापूस शेतकऱ्यांकडे आहे. खानदेशातील काही प्रमुख जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. त्यात रोज कमाल २०० गाठींची निर्मिती होत आहे.

ही निर्मिती पुढे वाढू शकते. कारण होळी सणानंतर कापूस प्रक्रिया उद्योग गती घेतो. सध्या खरेदीदारांना कापूस उपलब्ध होत असल्याने प्रक्रियादेखील वेग घेईल, असे संकेत आहेत.

धुळे व नंदुरबारात गुजरातमधील खरेदीदारांचे एजंट सक्रिय आहेत. काही शेतकरी मध्य प्रदेशातील बडवानी येथेही कापसाची विक्री करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT