Cotton Rate Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Ginning : कापूस नसल्याने अर्धे जिनिंग रिकामे

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस जास्त झाला. अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस उत्पादनात घट आली.

Team Agrowon

यवतमाळ : कापसाला कधी नव्हे, एवढा नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर गेल्यावर्षी मिळाला. यंदा कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत.

दर वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस (Cotton) घरातच ठेवला आहे. शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन गाठी तयार करून त्याची निर्यात (Cotton Export) करण्यासाठी जून-जुलैपर्यंत जिनिंग, प्रेसिंग उद्योग सुरू राहात होते. यंदा मात्र, बाजारात कापूसच येत नसल्याने ५० टक्के जिनिंग, प्रेसिंग मिल बंद झाल्या आहेत.

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस जास्त झाला. अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस उत्पादनात घट आली.

त्यामुळे कापूस कमी प्रमाणात बाजारात आला. परिणामी दिवाळीच्या काळात कापसाला बऱ्यापैकी दर मिळाला. आता तो दर खाली घसरला आहे.

शिवाय, कापसाचे दर वाढेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. त्याचा परिणाम गाठींवर झाला आहे.

कापूस नसल्याने जिल्ह्यातील अनेक जिनिंग-प्रेसिंग रिकामेच आहेत. जिल्ह्यात ८७ जिनिंग आहेत. त्यातील मोजक्याच जिनिंगला कापूस मिळाला आहे. त्यामुळे अनेक जिनिंग रिकाम्याच आहेत.

तब्बल १५ कोटींचा तोटा

आतापर्यंत जवळपास १५ कोटी रुपयांचा तोटा या उद्योगाला कापसाअभावी सहन करावा लागला आहे. प्रत्येक लॉटमागे पाच लाख रुपयांचे नुकसान जिनिंगमालकांना होत आहे.

आतापर्यंत दहा लॉट निघाले आहेत. त्यात दहा कोटी, तर ओव्हररेटचे जवळपास पाच कोटी असे एकूण १५ कोटींचे नुकसान जिनिंगमालकांचे झाले आहे.

अतिवृष्टीने कापूस उत्पादन कमी झाले. कापसाला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कापसाची बाजारातील आवक बंद झाली आहे. अनेक जिनिंग कापसाअभावी रिकाम्या आहेत. सध्यातरी शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे.
विजय निवल, कार्यकारी सदस्य, शेतकरी संघटना, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT