Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्यावरून वादंग

मुंबई उच्च न्यायालयातर्फे शनिवारी (ता. १०) सरन्यायाधीश उदय ललित यांचा हॉटेल ताज पॅलेस येथे सत्कार करण्यात आला. या समारंभाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्य सरकारच्या वैधानिकतेचा तिढा (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरन्यायाधीशांच्या (CJI) सत्काराला कसे उपस्थित राहू शकतात? शिवाय सरन्यायाधीश त्यांना कसे भेटू शकतात, असा सवाल राजकीय विरोधकांनी उपस्थित केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयातर्फे शनिवारी (ता. १०) सरन्यायाधीश उदय ललित यांचा हॉटेल ताज पॅलेस येथे सत्कार करण्यात आला. या समारंभाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याला केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय ललित, झुमा दत्ता यांची उपस्थिती होती.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे रविवारी (ता. ११) राज्य सरकारतर्फे सरन्यायाधीश ललित यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
शिंदे-फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरता स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासली जात आहे. केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही, तर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसणे साहजिकच आहे.
सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT