Thane News Agrowon
ताज्या बातम्या

Contaminated Water : ठाणे जिल्ह्यातील १८६ ग्रामपंचायतींना अशुद्ध पाणी

मुरबाड तालुक्यातील मिल्हे ग्रामपंचायतीतील सावरेवाडी या पाड्यावरील पाण्याचा स्रोत तीव्र जोखमीचा असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीतील १२० ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Team Agrowon

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील (Thane District) ग्रामीण भागाचा (Rural Area) वेगाने विकास सुरू असून अनेक विकासात्मक कामे (Rural Development) करण्यात येत आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील १८६ ग्रामपंचायतींतील (Grampanchyat) पाण्याचे स्रोत मध्यम दूषित (Contaminated water) असल्याचे समोर आले आहे.

मुरबाड तालुक्यातील मिल्हे ग्रामपंचायतीतील सावरेवाडी या पाड्यावरील पाण्याचा स्रोत तीव्र जोखमीचा असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीतील १२० ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये झपाट्याने विकासात्मक कामे करण्यात येत आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण यासह शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण अभियान राबवण्यात आले होते. या अभियानामध्ये जलस्रोतांची पाहणी करण्यात येत असते.

त्यानुसार पाच तालुक्यांतील ४३१ ग्रामपंचायतींतील ८१० गावांमधील नळ योजना, विहिरी, हातपंप या पाण्याच्या स्रोतांची पाहणी करून पाण्याचा दर्जा ठरवण्यात येत असतो. त्यानुसार पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रामपंचायतींना लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT