Konkan Type Bund Agrowon
ताज्या बातम्या

Konkan Type Bund : कोकण पद्धतीच्या पहिल्या बंधाऱ्यांची नाटळमध्ये उभारणी

जिल्ह्यात शासनाच्या विविध संस्था या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधतात. दोन्ही जिल्ह्याची भौगोलिक रचना, पावसाचे प्रमाण वेगवेगळे असल्यामुळे बंधाऱ्यांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नाटळ (ता. कणकवली) नदीवर कोकण पद्धतीचा पहिला बंधारा (Konkan Type Bund) उभारण्यात आला आहे. दोन कोटी लिटर पाण्याची क्षमता (Water Capacity) असलेला हा बंधारा जलसमृद्ध कोकण प्रतिष्ठान, दिगंत स्वराज्य फाउंडेशन आणि ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे.

जिल्ह्यात शासनाच्या विविध संस्था या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधतात. दोन्ही जिल्ह्याची भौगोलिक रचना, पावसाचे प्रमाण वेगवेगळे असल्यामुळे बंधाऱ्यांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कोकणात पडणाऱ्या पावसाचा अंदाज, नदीचे पाणी वाहण्याची गती याचा विचार करून या नद्यांवर बंधारे उभारण्यात यावे अशी येथील लोकांची मागणी होती.

परंतु त्यादृष्टीने शासनपातळीवरून कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. मात्र जलसमृद्ध कोकण प्रतिष्ठान, दिगंत स्वराज्य फाउंडेशन आणि नाटळ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून नाटळ नदीवर कोकणातील पहिला कोकण पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला आहे.

राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जलनायक संजय यादवराव, दिगंत स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष जलनायक राहुल तिवरेकर आणि जलसमृद्धी अभियानप्रमुख विश्वनाथ सावंत यांच्या माध्यमातून कोकणातील बंधाऱ्यांचे स्वतंत्र डिझाईन तयार करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT