Bharat Jodo Yatra  Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : भारत जोडो’च्या तयारीसाठी काँग्रेस नेत्यांची पायपीट

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुरुवारी (ता.१७) जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांपासून दिल्लीपर्यंतचे नेते कामाला लागले आहेत.

Team Agrowon

अकोलाः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) गुरुवारी (ता.१७) जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांपासून दिल्लीपर्यंतचे नेते कामाला लागले आहेत. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वारंवार दौरे होत आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १६ नोव्हेंबरला पातूर येथे पोचेल. तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.१७) बाळापूरकडे रवाना होईल. त्यानंतर १८ नोव्हेंबरला बाळापूर येथून शेगावला यात्रा पोचेल. या ठिकाणी राज्यातील दुसरी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता शेगाव येथील सभेचे नियोजन करण्यात आले.

ही सभा घेत गांधी शेगावमध्ये मुक्काम करतील. १९ नोव्हेंबरला ते भेंडवळ कडे निघतील. २० नोव्हेंबरला ते मध्यप्रदेशातील बोडार्ली येथे मुक्कामासाठी रवाना होतील. १६ ते २० नोव्हेंबर या काळात ही भारत जोडो यात्रा वाशीम-अकोला-बुलडाणा अशा तीन जिल्ह्यातून जाणार आहे.

या यात्रेच्या अनुषंगाने अकोला दौऱ्यावर आलेले माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तोडफोडीची भाषा करणारे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भेद निर्माण होणार नाही. भाजपच्या तत्त्व कार्यप्रणालीविरोधात सर्वच सोबत असून, राज्यात दाखल होत असलेल्या राहुल गांधी याच्या भारत जोडो यात्रेतून एकात्मकतेचे प्रतीक दिसून येईल, असे सांगितले. भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहेत, अशीही माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT