Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : गुणनियंत्रण चौकशीसाठी नेमलेली समिती वादात

गुणनियंत्रण कामांमध्ये गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी कृषी खात्याने दुसऱ्या एका वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः गुणनियंत्रण (Quality Control) कामांमध्ये गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी कृषी खात्याने (Agriculture Deportment) दुसऱ्या एका वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमरावती कृषी विभागातील अकोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी कार्यरत असलेले कांतप्पा खोत सध्या वादात सापडलेले आहेत. यांची चौकशी करण्यासाठी अमरावतीचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

या समितीचे अध्यक्षपद तोटावार यांना देण्यात आले आहे. सहसंचालक कार्यालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे तंत्र अधिकारी राजेश जानकर व कृषी अधिकारी अनंत मस्करे यांना या समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.

डॉ. खोत यांच्या विरोधात अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या कामामुळे विक्रेत्यांना जाच होत असल्याची तक्रार कृषी आयुक्तालयात गेली आहे. त्यामुळे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सहसंचालक मुळे यांना दिल्या आहेत. मुळे यांनी मात्र ही चौकशी थेट वादग्रस्त अधिकाऱ्याच्या हाती दिल्यामुळे खोत यांच्याकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी सचिन कुलकर्णी यांनी या प्रकरणात सर्व अधिकारी एकत्र येत बनवाबनवी करीत असल्याचे म्हटले आहे. मुळात नीती आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार झाला असून त्यात शेतकऱ्यांच्या नावे सामग्री वाटण्यासाठी बनावट पावत्या वापरल्या आहेत. या प्रकरणी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्याने चौकशी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.

यात प्रकरणात प्रथमदर्शनी तोटावार यांच्यासह काही अधिकारी दोषी दिसत आहे. त्याचे ठोस पुरावे आम्ही राज्य शासनाला सादर केले आहेत. त्यामुळे वादग्रस्त अधिकाऱ्याला चौकशीचा प्रमुख का केले, चौकशीसाठी दुसरा चांगल्या प्रतिमेचा अधिकारी उपलब्ध नाही का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

चौकशीसाठी मर्जीतील अधिकारी नेमण्याचा पॅटर्न

एकमेकांच्या चौकशा करण्यासाठी मुद्दाम आपल्याच मर्जीतील अधिकारी नेमण्याचा पॅटर्न कृषी खात्यात आधीपासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खोत व तोटावार प्रकरणाकडे बघता येईल. मंत्रालयापासून ते आयुक्तालयापर्यंत केवळ चौकशांचे आदेश दिले जात असून ठोस कारवाई होत नाही, अशी तक्रार कुलकर्णी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT