Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold weather : थंडीचा कडाका अजून तीन दिवस राहणार

आगामी तीन ते चार दिवस उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यामध्ये पारा आणखी घसरणार व तीन दिवस थंडी राहणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या समन्वयक डॉ. रवींद्र आंधळे यांनी दिली.

Team Agrowon

नगर : आगामी तीन ते चार दिवस उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे (Cold Weather) जिल्ह्यामध्ये पारा आणखी घसरणार व तीन दिवस थंडी (Clod Weather) राहणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या समन्वयक डॉ. रवींद्र आंधळे यांनी दिली.

जानेवारी ते मार्च हा थंडीचा कालावधी असतो. मध्यंतरीच्या काळामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले होते, तसेच बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही काळ थंडीचा प्रादुर्भाव दिसून आला नव्हता. दोन-तीन दिवसांपासून उत्तरेकडील शीतलहरी आपल्या भागामध्ये अचानक चक्राकार स्वरूपामध्ये वाहत आहेत.

पुढील तीन ते चार दिवस तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठातील केंद्रीय हवामानशास्त्र विभागाचे मोहन देठे यांनी कृषी विद्यापीठ परिसरातील तापमान नोंदविले आहे.

नगर जिल्ह्यात ९ जानेवारीला २६.६ व १०.९ व १० जानेवारीला कमाल २६ व किमान ९ एवढे तापमान नोंदवले गेले आहे.किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सिंचन संध्याकाळच्या वेळी करा.

रात्री गुरांना गोठ्यात ठेवावे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठा कोरडा असावा. कोंबड्यांच्या शेडमध्ये कृत्रिम प्रकाश देऊन पिले गरम ठेवा. सकाळी लवकर जनावरे चारायला नेऊ नका, असे आवाहन विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागाचे समन्वयक डॉ. आंधळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT