Cold Weather
Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्यात थंडी कमी होणार

Team Agrowon

पुणे : उत्तर महाराष्ट्रात गारठा (Cold Weather) कायम असून काही ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली आहे. किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ होणार असल्याने दोन दिवसांत राज्यात थंडी (Cold) कमी होण्याची शक्यता आहे. आज (ता. २४ उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे सोमवारी (ता. २३) राज्यातील निचांकी ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९ अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडी कमी होत आहे.

दरम्यान, स्वच्छ सुर्य प्रकाश जमीनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढला असून, राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा २९ ते ३३ अंशांच्या आसपास आहे.

सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. सोमवारी (ता. २३) राजस्थानच्या पिलानी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.१ (११.७), जळगाव ३१.३ (१२.७), धुळे २८.० (९.०), कोल्हापूर ३०.३ (१६.५), महाबळेश्वर २५.८(१३.२), नाशिक २९.६ (११.०), निफाड ३०.६ (८.७), सांगली ३०.५ (१५.०), सातारा ३०.९ (१३.७), सोलापूर ३३.० (१८.२),

सांताक्रूझ ३०.४ (१६.२), डहाणू २४.८ (१६.४), रत्नागिरी ३०.४(१६.२), औरंगाबाद २९.२ (११.४), नांदेड - (१६.४), उस्मानाबाद २९.६ (१६.१), परभणी ३१.०(१६.०), अकोला ३२.० (१६.२), अमरावती ३२.० (१६.९), बुलढाणा २९.८ (१५.२),

ब्रह्मपूरी २९.८ (१५.२), चंद्रपूर ३०.४ (१७.४), गडचिरोली ३१.०(१५.६), गोंदिया ३१.२(१५.०), नागपूर ३१.० (१४.८), वर्धा ३१.०(१६.०), वाशीम - (१५.४), यवतमाळ ३१.७ (१८.२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT