Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारठा वाढणार

राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार होत असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गारठलेला आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) चढ - उतार होत असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गारठलेला (Cold Weather Maharashtra) आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारठा (Cold) वाढण्याची शक्यता असून, विदर्भात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. गुरूवारी (ता. १२) निफाडसह, धुळे, जळगाव, पुणे, नाशिक, तसेच औरंगाबाद आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात किमान तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली होता. उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान १० ते १६ अंशांच्या दरम्यान होते. कमाल तापमानात वाढ झाली असून, जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे.

पश्चिमी चक्रावातांच्या प्रभावामुळे हिमालयपर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतात थंडीची लाट काहीशी कमी झाली असून, गुरूवारी (ता. १२) उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १३) उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, त्रिपुरा राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान दक्षिण भारतातील राज्यातून ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या हंगाम गुरूवारपासून (ता. १२) समाप्त झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

गुरूवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.१ (८.३), जळगाव ३०.८ (७.०), धुळे ३०.० (६.२), कोल्हापूर ३०.९ (१४.९), महाबळेश्वर २८.३(१३.१), नाशिक ३०.४ (९.२), निफाड ३०.६ (५.५), सांगली ३१.२ (१२.६), सातारा ३१.६(१०.८), सोलापूर ३३.५ (१४.०), सांताक्रूझ ३१.२ (१६.३), अलिबाग ३०.६ (१५.६), डहाणू २७.१ (१६.०), रत्नागिरी ३४.२ (१५.५),

औरंगाबाद ३०.६ (९.४), नांदेड - (१२.६), परभणी ३१.६ (१२.५), अकोला ३३.१ (१२.०), अमरावती ३२.० (१०.७), बुलढाणा ३१.६ (१४.०), ब्रह्मपूरी ३२.० (१२.४), चंद्रपूर २८.८ (१३.०), गडचिरोली ३०.२(११.६), गोंदिया ३०.०(१०.५), नागपूर ३०.४ (११.०), वर्धा ३१.२(११.९), वाशीम ३२.८ (१२.२), यवतमाळ ३१.७ (११.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT