Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा टिकून आहे. आज (ता. २३) किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा (Cold Weather) टिकून आहे. आज (ता. २३) किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे.

दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा (Heat) चटका जाणवत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे रविवारी (ता. २२) राज्यातील निचांकी ९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.२ अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान १२ ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

स्वच्छ सुर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढला असून, राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३३ अंशांच्या जवळपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. रविवारी (ता. २२) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) पंजाब हरियाणा, चंडीगडमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.४ (१२.२), जळगाव ३१.६ (१२.०), धुळे ३२.० (९.२), कोल्हापूर ३०.१ (१६.३), महाबळेश्वर २६.४(१३.७), नाशिक ३०.४ (१२.२), निफाड ३०.६ (९.१), सांगली ३०.५ (१५.३), सातारा २९.९ (१३.३), सोलापूर ३२.७ (१५.८), सांताक्रूझ - (१७.०), डहाणू २५.७ (१५.९), रत्नागिरी ३१.२(१७.०),

औरंगाबाद २९.७ (११.३), नांदेड ३१.६ (१६.४), परभणी ३०.८(१५.२), अकोला ३२.४ (१६.४), अमरावती ३०.८ (१६.३), बुलढाणा ३०.४ (१६.०), ब्रह्मपूरी ३३.० (१५.९),

चंद्रपूर ३०.४ (१७.०), गडचिरोली ३१.०(१५.२), गोंदिया ३०.०(१५.२), नागपूर ३०.५ (१५.१), वर्धा ३१.०(१६.०), वाशीम ३२.६ (१५.२), यवतमाळ ३१.० (१९.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT