Cold Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम

किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. रविवारी (ता. ५) उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही थंडी कायम होती.

Team Agrowon

Cold Weather Update पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला (Cold Weather) आहे. रविवारी (ता. ५) उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही थंडी कायम होती. आज (ता. ६) किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

रविवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे, औरंगाबाद, जळगाव येथे पारा १० अंशांच्या खाली होते.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात घट कायम असल्याने गारठा होता. कमाल तापमानातही वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा ३० अंशांच्या वर गेला आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओसरले आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. रविवारी (ता. ५) मध्य प्रदेशातील मालाजखंड येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता.६) उत्तराखंड, पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय राज्यात विजा, गारपीटीसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (१०.९), जळगाव ३३.४ (१०.०), धुळे ३०.०(८.७), कोल्हापूर ३१.५(१८.५), महाबळेश्वर २९.७ (१५.६), नाशिक ३१.२ (११.६), निफाड ३१.० (८.१), सांगली ३३.२ (१६.१), सातारा ३२.४ (१४.७), सोलापूर ३५.० (१६.०),

सांताक्रूझ ३३.१ (१८.९), डहाणू २८.२ (१७.१), रत्नागिरी ३५.६(१९.४), औरंगाबाद ३१.४ (९.२), नांदेड - (१२.४), परभणी ३१.६(११.०),

अकोला ३३.९ (११.९), अमरावती ३२.६(१२.४), बुलडाणा ३०.०(१३.०), ब्रह्मपुरी ३३.० (१२.६), चंद्रपूर ३०.६(११.६), गडचिरोली ३१.६(१२.२), गोंदिया ३१.० (१०.५), नागपूर ३१.३ (११.०), वर्धा ३२.१(१२.२), वाशीम - (१२.२), यवतमाळ ३१.० (११.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT