Cold Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Clod Weather : मध्य महाराष्ट्रात थंडी टिकून

उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात थंडी टिकून आहे, उर्वरित राज्यात मात्र गारठा कमी झाला आहे.

Team Agrowon

पुणे : उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात थंडी (Cold Weather) टिकून आहे, उर्वरित राज्यात मात्र गारठा (Heavy Cold) कमी झाला आहे. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्रात किमान तापमानातील (Temperature) घट कायम राहणार आहे. विदर्भ, कोकणासह मराठवाड्याच्या तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात गुरुवारी (ता. १९) राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत असून, तापमानाचा पारा २७ ते ३५ अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

पश्‍चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत व लगतच्या भागात होत असलेली हिमवृष्टी होत आहे. मात्र उत्तर भारतातील राज्यात थंडी काहीशी कमी झाली आहे. गुरुवारी (ता. १९) मध्य प्रदेशच्या नवगांव येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या नीचांकी २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी (ता. २०) ओडिशा, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या काही भागांत दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३१.६ (१०.७), जळगाव २९ (११.२), धुळे २८ (८), कोल्हापूर ३१.८ (१७.२), महाबळेश्‍वर २८.६ (१३.९), नाशिक ३०.१ (११.४), निफाड २९.८ (९), सांगली ३१ (१५.१),

सातारा ३२.७ (१३.१), सोलापूर ३४.४ (१७.५), सांताक्रूझ ३२.५ (१६.२), डहाणू २७.९ (१४.२), रत्नागिरी ३२.१ (१६.१), औरंगाबाद ३०.५ (१०.६), नांदेड ३२.४ (१७), परभणी ३१.४ (१४.५), अकोला ३१.४ (१५.५), अमरावती ३०.८ (१४.१),

बुलडाणा २९.२ (१५.२), ब्रह्मपुरी ३०.७ (१६.६), चंद्रपूर २९.२ (१७.६), गडचिरोली ३०.४ (१४.६), गोंदिया २८ (१२.५), नागपूर २८.२ (१३.६), वर्धा २९ (१४.९), वाशीम ३२.२ (१६), यवतमाळ ३१ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT