Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात घट होत असल्याने गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात (Minimum Temperature) घट होत असल्याने गारठा (Clod Weather) वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. तर निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका (Heat) जाणवत आहे. आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तर भागात किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने शनिवारी (ता. २४) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान होता.

तर विदर्भातील ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही १२ ते २२ अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे. अनेक भागात पहाटे गारठा तर दुपारी चटका अशी स्थिती कायम आहे.

राजस्थानातील चूरू येथे शनिवारी (ता. २४) देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी २.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थान या राज्यांमध्येही थंडीच्या लाटेचा इशारा असून, थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. तर हरियाणा, चंडीगड, पंजाब, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेशात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

श्रीलंकेजवळील तीव्र कमी दाब क्षेत्र कायम

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) कायम आहे. ही प्रणाली तामिळनाडूच्या नागापट्टीनमपासून ४८० किलोमीटर ईशान्येकडे तर चेन्नईपासून ५०० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात होती. हे तीव्र कमी दाब क्षेत्र उद्यापर्यंत (ता. २६) भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (११.६), जळगाव ३१.८ (१३.०), धुळे ३०.० (८.४), कोल्हापूर ३१.९ (१७.४), महाबळेश्वर २८.२(१५.२), नाशिक २९.८ (१०.३), निफाड ३०.२ (७.८), सांगली ३२.२ (१५.२), सातारा २९.०(१४.०), सोलापूर ३३.८ (१५.८), सांताक्रूझ ३०.६(१६.०), डहाणू २६.८ (१७.५), रत्नागिरी ३२.६ (१९.१), औरंगाबाद ३१.० (११.६), नांदेड ३२.२ (१४.६), परभणी ३२.१ (१४.६), अकोला ३३.४ (१६.२), अमरावती ३२.८ (१५.१), बुलढाणा ३२.२ (१६.४), ब्रह्मपूरी ३४.० (१४.१), चंद्रपूर ३०.६ (१५.०), गडचिरोली ३१.०(१२.४), गोंदिया ३०.२(१३.६), नागपूर ३१.३ (१३.७), वर्धा ३१.९(१४.२), यवतमाळ ३२.५ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT