Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार सुरूच आहेत. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) चढ - उतार सुरूच आहेत. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा (Clod Weather) वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात थंडी (Cold) टिकून आहे. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात गारठा वाढला आहे. काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.

शनिवारी (ता. १४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली होता.

उर्वरित राज्यातही किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, जवळपास अनेक ठिकाणी तापमान २८ अंशांच्या वरच आहे.

पश्चिमी चक्रावातांच्या प्रभावामुळे हिमालयपर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. थंडीची लाट आल्याने शनिवारी (ता. १४) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी उणे ०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १५) पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

गारठा अधिक असलेली ठिकाणे :

निफाड ५.८, जळगाव ८.०, धुळे ८.६, नाशिक ८.८,

औरंगाबाद ८.८, पुणे ९.०.

शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.१ (९.०), जळगाव - (८.०), धुळे २९.० (८.६), कोल्हापूर ३०.४ (१५.०), महाबळेश्वर २८.१(१२.५), नाशिक २५.१ (८.८), निफाड ३०.६ (५.८), सांगली ३०.७ (१३.६), सातारा ३१.९(११.०), सोलापूर ३३.२ (१४.३), सांताक्रूझ २७.५ (१५.२),

डहाणू २४.९ (१४.२), रत्नागिरी २९.५ (१७.५), औरंगाबाद २८.८ (८.८), नांदेड - (१४.२), परभणी ३०.५(१३.४), अकोला ३२.१ (१४.२), अमरावती ३०.६ (१२.३), बुलडाणा २९.० (१३.०), ब्रह्मपुरी ३२.२ (१५.५), चंद्रपूर २९.६ (१५.४), गडचिरोली ३०.४(१२.६), गोंदिया २९.५(१३.०), नागपूर ३०.२ (१४.२), वर्धा ३१.२(१५.०), वाशीम ३१.८ (१४.०), यवतमाळ ३०.५ (१२.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT