Cold Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : उत्तर महाराष्ट्र गारठला

किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाडा गारठला आहे. निफाड, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे येथे थंडी वाढली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाडा गारठला (Cold Weather) आहे. निफाड, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे येथे थंडी वाढली आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तर औरंगाबाद येथे ९.४, जळगाव येथे १०, नाशिक येथे १०.२ आणि पुणे येथे १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १९ अंशांच्या दरम्यान होता. उन्हाचा चटका कायम असला तरी राज्याच्या कमाल तापमानातही घट होत आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र होत आहे. आज (ता. ३) पंजाब, राजस्थान येथे थंडीची तीव्र लाट, तर हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, या राज्यात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (ता. २) राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.१ (१०.९), जळगाव २९.० (१०.०), धुळे २८.५ (७.८), कोल्हापूर ३१.७ (१८.०), महाबळेश्वर २६.८(१४.२), नाशिक ३०.७ (१०.२), निफाड ३०.० (७.६), सांगली ३१.४ (१६.९), सातारा ३१.९(१४.५), सोलापूर ३४.१ (१८.८), सांताक्रूझ २९.५ (१५.८), डहाणू २६.९ (१५.४), रत्नागिरी ३०.७ (१७.८), औरंगाबाद ३०.६ (९.४), नांदेड ३१.२ (१४.६), उस्मानाबाद - (१३.०), परभणी ३१.३ (१४.६), अकोला ३०.८ (१४.४), अमरावती ३१.४ (१४.९), बुलढाणा ३०.४ (१३.२), ब्रह्मपूरी ३१.१ (१४.५), चंद्रपूर २८.६ (१६.३), गडचिरोली ३०.६(१३.८), गोंदिया २८.२(११.६), नागपूर २८.६ (१३.६), वर्धा २८.५(१३.८), यवतमाळ ३०.७ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू

Farmers' Mental Health: मानसिक तणाव, नैराश्यात असणाऱ्यांची संख्या चिंताजनक; शिवार हेल्पलाइनच्या अहवालातून चिंता व्यक्त

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Suspended: ३१ तासांनंतर स्वाभिमानीचे ‘रास्ता रोको’ स्थगित; पुणे-बंगळूर महामार्ग मोकळा

Soybean Price: चंदनखेडा उपबाजारात सोयाबीनला ६४०० रुपये दर

E-Peek Pahani Problems: ई-पीक पाहणीतील अडथळ्यांनी शेतकरी त्रस्त; स्मार्टफोन, सर्व्हर, लोकेशन टॅगिंगच्या अडचणी

SCROLL FOR NEXT