Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : गारठा कायम राहण्याचा अंदाज

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट आली होती. राज्यातील लाट काहीशी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) चढ - उतार होत असला तरी हुडहुडी (Cold) कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे हंगामातील नीचांकी ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा (Cold Weather) कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट आली होती. राज्यातील लाट काहीशी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

बुधवारी (ता. ११) निफाडसह, धुळे, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नाशिक, गोंदिया, गडचिरोली येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली होता. तर कोकण वगळता जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान १२ अंशांच्या खाली होते.

एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावतांमुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कमी-अधिक होत आहे. बुधवारी (ता. ११) राजस्थानातील अलवार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १२) उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग, आसाम, त्रिपुरा राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान दक्षिण भारतातील राज्यातील ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या हंगाम आज (ता. १२) समाप्त होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.१ (८.१), जळगाव ३०.६ (७.५), धुळे २८.५ (६.४), कोल्हापूर ३०.५ (१४.७), महाबळेश्वर २८.६(१३.६), नाशिक २९.४ (९.०), निफाड २९.५ (६.३), सांगली ३१.६ (१२.४), सातारा ३१.५(१०.१), सोलापूर ३३.७ (१३.७), सांताक्रूझ ३३.५ (१७.०), अलिबाग ३२.२ (१५.०), डहाणू २९.६ (१५.८), रत्नागिरी ३४.४ (१६.१),

औरंगाबाद ३०.४ (८.२), नांदेड - (१२.०), परभणी ३०.३ (११.०), अकोला ३२.९ (११.६), अमरावती २९.४ (११.३), बुलढाणा २९.० (१२.०), ब्रह्मपूरी ३१.८ (१२.१), चंद्रपूर २८.८ (१२.०), गडचिरोली २९.२(९.८), गोंदिया २९.८(९.४), नागपूर ३०.७ (१०.१), वर्धा ३१.५(११.४), वाशीम ३२.२ (१२.४), यवतमाळ ३०.७ (१२.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT