Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : थंडी गायब, उकाडा वाढला

ढगाळ आकाश, पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे राज्याच्या किमान तापमानात झालेली वाढ कायम आहे. राज्यात थंडी गायब झालीअसून, दुपारच्या वेळी उकाडाही चांगलाच वाढला आहे.

Team Agrowon

पुणे : ढगाळ आकाश, पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे (Fog) राज्याच्या किमान तापमानात झालेली वाढ (Maximum Temperature) कायम आहे. राज्यात थंडी (Cold Weather) गायब झालीअसून, दुपारच्या वेळी उकाडाही (Heat) चांगलाच वाढला आहे.

आज (ता. १) राज्याच्या किमान तापमानातील वाढ टिकून राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २) उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पावसाला पोषक हवामान निवळत असले तरी काही भागात अंशतः ढगाळ हवामान होत आहे, पहाटे धुक्याची चादर अनुभवायला मिळत असून, किमान तापमानात झालेली वाढ कायम आहे. मंगळवारी (ता. ३१) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी १२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातही वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. आज दुपारपर्यंत (ता. १) ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत येऊन नैर्ऋत्य दिशेकडे वळण्याचे संकेत आहेत. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी अधिक होत आहे.

मंगळवारी (ता. ३१) राजस्थानच्या फालोदी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १) तामिळनाडू, केरळ राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.६ (१४.९), जळगाव ३०.४ (१६.५), धुळे २९.० (१३.४), कोल्हापूर ३०.० (१९.४), महाबळेश्वर २४.६ (१३.५), नाशिक २८.६ (१४.५), निफाड २९.० (१२.३), सांगली ३१.२ (१७.९), सातारा २९.८ (१५.८), सोलापूर ३३.० (१९.६), सांताक्रूझ २९.७ (१९.८), डहाणू २६.० (१९.१), रत्नागिरी २९.६(१९.७),

औरंगाबाद ३०.२ (१३.६), नांदेड ३१.८ (१७.८), उस्मानाबाद - (१८.०), परभणी ३१.६(१६.६), अकोला ३२.८ (१६.९), अमरावती ३३.८ (१७.३), बुलढाणा ३०.४ (१८.१), ब्रह्मपूरी ३३.४ (१८.१), चंद्रपूर ३१.६ (१९.२), गडचिरोली ३१.४(१६.२), गोंदिया ३२.०(१६.८), नागपूर ३२.३ (१८.३), वर्धा ३२.९(१८.४), यवतमाळ ३२.५ (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT