Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता

राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार होत आहे. किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असली तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत गारठा टिकून आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार होत आहे. किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असली तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत गारठा टिकून आहे.

आज (ता. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department ) वर्तविली आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात गारठा वाढला आहे. काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.

शुक्रवारी (ता. १३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, निफाड, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली होता.

काही ठिकाणी झालेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून, जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे.

पश्चिमी चक्रावातांच्या प्रभावामुळे हिमालयपर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे.

शुक्रवारी (ता. १३) गुजरातच्या नालिया येथे देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १४) हिमाचल प्रदेश, उत्तर राजस्थान आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये तुरळक ठिकणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

तर पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

गारठा अधिक असलेली ठिकाणे :
धुळे ७.०, पुणे ९.२, निफाड ९.५, औरंगाबाद ९.८.

शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (९.२), जळगाव २९.२ (१२.७), धुळे ३०.५ (७.०), कोल्हापूर ३१.२ (१५.२), महाबळेश्वर २६.५(११.५), नाशिक २८.५ (१३.०), निफाड ३१.० (९.५), सांगली ३१.५ (१३.४), सातारा ३१.९(१०.४), सोलापूर ३३.८ (१५.१), सांताक्रूझ २९.१ (१९.४), डहाणू २६.७ (१९.४), रत्नागिरी ३१.४ (१८.०),

औरंगाबाद २९.४ (९.८), नांदेड ३१.४ (१४.०), परभणी ३१.१ (१३.०), अकोला ३१.९ (१३.५), अमरावती ३०.२ (११.३), बुलडाणा ३१.० (१५.२), ब्रह्मपुरी ३१.८ (१४.२), चंद्रपूर ३०.२ (१४.६), गडचिरोली ३०.०(११.६),

गोंदिया २९.८(११.८), नागपूर ३०.५ (१२.५), वर्धा ३१.५(१२.५), वाशीम ३२.६ (१४.४), यवतमाळ ३१.५ (१२.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vasantrao Naik Awards: वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे शेतीविषयक पुरस्कार जाहीर

Agriculture Water Scarcity: पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात

Agriculture Department Action: अप्रमाणित निविष्ठांप्रकरणी तीन महिन्यांत ९४ गुन्हे

Farmer Crisis: नाशिक विभागात पाच महिन्यांत ११९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Crop Insurance Scheme: पीकविमा कंपन्यांना ६९४४ कोटींचा नफा

SCROLL FOR NEXT