Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्यात गारठा वाढू लागला

राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १८ अंशांखाली आल्याने पहाटे गारठा वाढू लागला आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, दुपारी उन्हाचा चटका कायम आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान (Minimum Temperature) १८ अंशांखाली आल्याने पहाटे गारठा (Cold Weather) वाढू लागला आहे. कमाल तापमानात (Maximum Temperature) चढ-उतार सुरू असून, दुपारी उन्हाचा चटका (Heat) कायम आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३१) राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्याने रविवारी (ता. ३०) दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सर्वदूर पोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन दुपारी उन्हाची ताप वाढली आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.३ (१२.६), जळगाव ३३.८(१४.०), कोल्हापूर २९.७ (१७.७), महाबळेश्वर २५.७(१३.८), नाशिक २९.० (१३.३), निफाड ३०.२ (१२.२), सांगली ३१.६(१७.२), सातारा ३०.०(१४.३), सोलापूर ३२.८ (१६.१), सांताक्रूझ ३४.४(२०.५), डहाणू ३४.७ (२०.३), रत्नागिरी ३४.५ (२२.२), औरंगाबाद ३०.२ (१३.०), नांदेड ३१.८ (१६.४), उस्मानाबाद - (१५.२), परभणी ३०.९ (१५.४), अकोला ३३.७ (१७.८), अमरावती ३३.६ (१५.५), ब्रह्मपूरी ३३.२ (१७.१), बुलढाणा ३०.७ (१६.६), चंद्रपूर ३१.२ (१७.४), गडचिरोली ३१.६(१६.२), गोंदिया ३०.८(१७.०), नागपूर ३२.२ (१६.८), वर्धा ३२.२(१६.६), यवतमाळ ३२.५ (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT