Weather Upadte Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा टिकून

उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच राहणार

Team Agrowon

पुणे : अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा टिकून आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २८) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १२ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या वरच आहे.

उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट ओसरली असली तरी, थंडी कायम आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी (ता. २८) देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, ओडिशासह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.४ (१५.३), जळगाव ३२.२ (१०.१), धुळे ३०.० (१०.०), कोल्हापूर ३०.६ (२०.५), महाबळेश्वर २७.५(१६.५), नाशिक ३१.७ (११.९), निफाड ३४.८ (८.२), सांगली ३१.८ (१८.०), सातारा ३०.६(१६.७), सोलापूर ३४.८ (२०.१), सांताक्रूझ ३१.५(१७.२), डहाणू २६.१ (१६.७), रत्नागिरी ३३.४ (२२.१), औरंगाबाद ३०.४ (१३.२), नांदेड - (१९.८), उस्मानाबाद - (१९.४), परभणी ३२.६ (१८.६), अकोला ३३.८ (१९.६), अमरावती ३२.४ (१८.४), बुलडाणा ३१.६ (१७.४), ब्रह्मपुरी ३२.९ (१९.५), चंद्रपूर ३१.२ (२१.४), गडचिरोली ३०.६(१६.६), गोंदिया ३०.५(१६.४), नागपूर ३१.७ (१८.७), वर्धा ३३.०(१८.९), यवतमाळ ३२.० (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : मनोज जरांगे

Sangli APMC Trifurcation: सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव सादर

Gram Panchayat Administrator: कृषी अधिकाऱ्यांचीही ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती होणार

Pomegranate Farming: डाळिंबासाठी स्थानिक सूक्ष्मजीवांचा वापर प्रभावी

MSRTC Women Concession: एसटीमध्ये ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणी पावतीवरही सवलत

SCROLL FOR NEXT