Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात गारठा कायम

किमान, कमाल तापमानात चढ-उतार सुरूच

Team Agrowon


पुणे : राज्यात गुलाबी थंडीचे (Cold Season) आगमन झाल्यानंतर गारठा कायम आहे. दोन दिवसांपासून राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. राज्यात थंडी कायम राहणार असली, तरी किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत असून, त्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उद्यापर्यंत (ता. २५) अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचे शक्यता आहे.

दरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, राजस्थानमधील चूरू येथे बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये किमान तापमानात काहीशी वाढ होत राज्यातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. जळगाव, नाशिक येथे किमान तापमानाचा पारा अद्यापही १० अंशांपेक्षा खाली होता. उर्वरित राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र पहाटेच्या वेळी गारठा कायम असून, धुके आणि दव पडल्याचे चित्र आहे. आज (ता. २४) राज्यात थंड व कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.


बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३१.४ (१४.४), जळगाव - (८.६), धुळे २९.० (८.४), कोल्हापूर ३०.१ (१९.२), महाबळेश्‍वर २७.४ (१४.३), नाशिक २९.२ (१०), निफाड २८.४ (८.२), सांगली ३०.४ (१८.२), सातारा २९.५ (१८.२), सोलापूर ३३.८ (१८.८), सांताक्रूझ ३२ (२०), डहाणू ३०.९ (१७.४), रत्नागिरी ३३.६ (२१), औरंगाबाद ३०.७ (११.२), नांदेड - (१६.४), परभणी ३१.५ (१४.८), अकोला ३१.४ (१३.८), अमरावती ३०.४ (१०.५), बुलडाणा २८.६ (१३.५), ब्रह्मपुरी ३१.२ (१५.३), चंद्रपूर २९.२ (१७), गडचिरोली ३० (१४.६), गोंदिया २९ (१२.४), नागपूर ३० (१२.८), वर्धा २९.५ (१४.४), वाशीम - (१३.२), यवतमाळ ३०.५ (१०.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Stock Limit: साखर साठा १५ दिवसांपर्यंतच ठेवता येणार, सणासुदीपूर्वी केंद्राचा निर्णय

Dushkal Trigar: ‘ट्रिगर वन’ लागू झालेल्या ६ तालुक्यांत पंचनाम्यांना वेग

Maharashtra Drought : सरकारी योजनांमधून गावांचा विकास कसा होणार?

Gadchiroli Vikas: अतिदुर्गम गावांच्या विकासाला प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी पंडा

Finance Commission: १५ व्या वित्त आराखड्यास आता शासनाची परवानगी

SCROLL FOR NEXT