Cold weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold weather : खानदेशात हुडहुडी कायम

यंदा नोव्हेंबरमध्ये अखेरीस काही दिवस थंडी होती. डिसेंबरमध्ये कमाल दिवस ढगाळ वातावरण होते. थंडी गायब झाली होती.

Team Agrowon

जळगाव : खानदेशात मागील चार दिवस थंडी कायम (Cold weather) आहे. रब्बी पिकांना (Rabbi crop) याचा लाभ होईल, अशी स्थिती आहे. थंडीमुळे केळी बागांत मात्र करपा रोग वाढत आहे.

शेतकरी रब्बी पिकांसाठी थंडीच्या प्रतीक्षेत होते. यंदा नोव्हेंबरमध्ये अखेरीस काही दिवस थंडी होती. डिसेंबरमध्ये कमाल दिवस ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. थंडी गायब झाली होती.

या महिन्यातही सुरवातीला काही दिवस पावसाळी वातावरण होते. परंतु या आठवड्यात सोमवारपासून (ता.९) हुडहुडी भरविणारी थंडी आहे.

गहू निसवत असून, दादर ज्वारीही जोमात आहे. हरभरा पिकातही घाटे लागली आहेत. या पिकांसाठी थंडी लाभदायी ठरत आहे. परंतु केळी पिकात करपा रोग वाढण्याची स्थिती आहे.

थंडी कायम राहील, अशी शक्यता आहे. यामुळे यंदा रब्बी पिके जोमात येतील, असे दिसत आहे. थंडीमुळे गहू, मका आदी पिकांना कमी पाणी लागत आहे.

सातपुडा व इतर भागांत थंडी अधिक असल्याने पशुधनासह बालके, वृद्धांसमोर अडचणी येत आहेत.

नंदुरबारमधील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा भागातील पाड्यांवरील सरपंचांनी मुद्दा उपस्थित करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, थंडीत केळी पक्व होण्याची क्रियाही मंद झाली आहे. यामुळे केळी काढणीवर परिणाम झाला आहे. तसेच केळी बागांच्या निसवणीलाही फटका बसत आहे.

शेतकऱ्यांना बागांच्या बचावासाठी बागेभोवती शेकोट्या करणे, आदीवर भर द्यावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT