Cloudy Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा पिकांना फटका

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सततचे ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, भाजीपाॅला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

वडाळी, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सततचे ढगाळ हवामान (Cloudy Weather), अवकाळी पाऊस आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, भाजीपाॅला पिकांवर (Vegetable Crop) रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. त्यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वडाळी, जयनगर, कोंढावळ, बामखेडा, तोरखेडासह परिसरातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी, बोअरवेल, विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभऱ्याच्या वाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळीबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हतबल होत शेतकरी महागडी कीडनाशके घेऊन ती पिकांवर फवारणी करत आहेत.

- दीपक पाटील, प्रगतिशील शेतकरी, वडाळी, ता. शहादा, जि. नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT