Crop Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण कायम

एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा थंडी गायब होणे, अचानक वारा सुटणे असे प्रकार सातत्याने सुरू असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या वातावरणात मोठा बदल (Climate Change) झाला असून दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असून थंडीदेखील कायम आहे. या वातावरणामुळे आंबा (Mango), काजू या फळपिकांवर (Cashew Crop) किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा थंडी गायब होणे, अचानक वारा सुटणे असे प्रकार सातत्याने सुरू असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली.

१३ सेल्सिअस डिग्रीपर्यंत तापमान घसरले. एकीकडे थंडीचे प्रमाण वाढत असताना मंगळवारी (ता. २२) पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले. काही भागांत पावसाचा शिडकावादेखील झाला. त्यानंतर मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. बुधवारी सकाळपासूनदेखील ढगाळ वातावरण कायम आहे.

या वातावरणामुळे आंबा, काजू बागांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंबा, काजूला काही भागांत पालवी तर आंबा बागांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT