Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरणाने धास्ती

तासगाव पूर्व भागातील द्राक्षपिकाची स्थिती : रोगाचा प्रादुर्भाव वाढला

Team Agrowon

तासगाव, ता. ५ : तासगाव पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोरगाव, शिरगाव, आळते, निंबळक, राजापूर, विसापूर भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष क्षेत्र आहे. काही ठिकाणी फुलोरावस्थेत असलेल्या बागांतील फूलगळ होऊ लागली असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.

तासगाव तालुक्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यातून येणाऱ्या उत्पन्नावर या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या अनेक भागांत फळ तयार होण्याच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागा आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होण्यास सुरवात झाली आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांत हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळे अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे हा फुलोरावस्थेत गळ होऊ लागली आहे. काही ठिकाणी सकाळी दव पडत असल्याने फळकुजीची समस्या होण्याची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेले पीक जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासून द्राक्षावर फवारणी करण्यासाठी खटपट सुरू आहे.

पुढील काही दिवस वातावरण असेच राहिले, तर डाऊनीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्षबागांत सातत्याने कीटकनाशकांची फवारणी करावी लागते आहे. परिणामी, उतपादनखर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनाहून खर्च अधिक होत असल्यामुळे द्राक्षपीक यंदाच्या वर्षी तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यंदा अवेळी बदलत्या वातरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च ज्यादा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

- महादेव पाटील, द्राक्ष उत्पादक (निंबळक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT