Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop damage : नुकसानीची करा ऑफलाइन तक्रार

सिल्लोडला कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन

Team Agrowon

सिल्लोड : परतीच्या पावसाने खरिपाच्या उत्पादनास फटका बसला
आहे. तालुक्यात खरीप पेरणीनंतर सुमारे १ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. मागील काही अनुभव बघता पीकविमा (Crop Insurance) कंपण्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाना पाने पुसण्याचाच प्रकार केला आहे. शेतकऱ्यांची थट्टा पीकविमा कंपन्यांकडून करण्यात आली. निकषांची दोरी लावून केवळ शेतकऱ्यांकडून पीकविम्याचे पैसे जमा करण्यात आले. परंतु, देताना मात्र पीकविमा कंपण्यांनी हात आखडता घेतला.

यावर्षी देखील सततचा पाऊस, तसेच परतीच्या पावसाने शेतीमालाची राखरांगोळी केली. पीकविमा काढल्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी
याची माहिती ७२ तासांच्या आत ऑनलाइन विमा कंपनीच्या पोर्टलवर करणे आवश्यक होते. परंतु यासाठी अनेकवेळा तांत्रिक त्रुटीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना याची माहिती पीकविमा कंपनीच्या पोर्टलवर करणे शक्य झाले नाही. परंतु, आता कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, पुढील दोन दिवसांत नुकसानीची ऑफलाइन तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने गावोगावी करण्यात येत आहे.


पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याच्या पावतीसह ऑफलाइन तक्रार कंपनीचे सिल्लोड शहरातील कार्यालय, पंतप्रधान पीकविमा ऑफिस, दत्त मंदिराजवळ टिळकनगर, सिल्लोड येथे तसेच कृषी विभागाच्या कार्यालयात करता येणार आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑफलाइन तक्रार करणे गरजेचे आहे.

तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी याची लेखी तक्रार पीकविमा कंपनीच्या सिल्लोड येथील कार्यालयात करावयाची आहे. यासाठी पीकविमा काढल्याची पावती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT