Jain Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Jain Irrigation : लिंबूवर्गीय संस्थेचा जैन इरिगेशनसोबत करार

रोगमुक्‍त लागवड साहित्याच्या उत्पादनात महत्त्व असलेले ‘शूट टीप ग्राफ्टिंग’ हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते.

Team Agrowon

Nagpur News ः रोगमुक्‍त लागवड (Diseased Free Cultivation) साहित्याच्या उत्पादनात महत्त्व असलेले ‘शूट टीप ग्राफ्टिंग’ (Shoot To Grafting) हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. या तंत्रज्ञानाच्या हस्तांतराबाबत जैन इरिगेशन (Jain Irrigation) आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या करारानुसार लिंबूवर्गीय संस्था पुढील एक वर्ष जैन इरिगेशनच्या कर्मचाऱ्यांना विविध लिंबूवर्गीय जातींचे सर्वोत्तम दर्जाचे रोगमुक्‍त लागवड साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या रोगमुक्‍त रोपांना शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. भारतभरातून सुमारे १ कोटी ८० लाख कलमांची मागणी दरवर्षी राहते. परंतु संस्थेची मर्यादा केवळ तीन लाख रोपे तयार करण्याची आहे.

त्यामुळे संस्थेने आपल्याकडील तंत्रज्ञान खासगी सार्वजनिक भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून हस्तांतरावर भर दिला आहे. लिंबूवर्गीय ‘शूट टीप ग्राफ्टिंग’वरील तंत्रज्ञान आणि मायक्रोग्राफ्टस तंत्रज्ञानाचा त्यामध्ये समावेश आहे. देशभरात अनेक रोपवाटिकाधारकांना हे तंत्रज्ञान सशुल्क हस्तांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान, जैन एरिगेशनकडूनही या तंत्रज्ञानाची मागणी होती. त्यानुसार सीसीआरआय तसेच जैन इरिगेशन यांच्यात तंत्रज्ञान हस्तांतराची प्रक्रिया झाली. ‘सीसीआरआय’चे संचालक डॉ. दिलीप घोष, जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल ढाके यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. डॉ. एन. विजयाकुमारी, डॉ. एम. एस. लदानिया, डॉ. बी. के. यादव उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT