Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांकडून जाणूण घेणार शेतीचे प्रश्‍न

शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी मंगळवारी (ता. ९) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक आयोजित केली आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News शेतकऱ्यांचे प्रश्‍न (Farmers Issue) समजून घेण्यासाठी मंगळवारी (ता. ९) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक आयोजित केली आहे.

त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti), किसान जिहादीचे विनायकराव पाटील, शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा, कराडचे पंजाबराव पाटील आदींना आमंत्रित केले आहे.

या बैठकीसंदर्भातील पत्र राज्य शासनाचे कार्यासीन अधिकारी अ. ज्ञा. लांडगे यांनी काढले आहे. या बैठकीला राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहतील.

‘‘मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. या कारणाने त्यांना कर्ज मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी.

नियमित कर्जफेडणाऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजनेचे प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याशिवाय तेलंगणा राज्याप्रमाणे छोटी बॅरेज बांधून राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवावे. शेतीसाठी दिवसा वीज आवश्‍यक आहे. या संदर्भातील मागण्या या बैठकीत करू,’’ असे शहा यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलविल्याबाबत स्वागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्‍न, पिकांची नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा योजना यासह अनेक प्रलंबित प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना सांगून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
-सिकंदर शहा, अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT