Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Smart Project : ‘स्मार्टला’ मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिले मनुष्यबळ

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पासाठी मनुष्यबळ दिले जात नसल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुकटीसरशी सोडविला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पासाठी मनुष्यबळ दिले जात नसल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुकटीसरशी सोडविला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपले बदल्यांचे अधिकार थेट आयुक्तांना देत तत्काळ मनुष्यबळ भरावे, असे सूचित केले आहे.

प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २१०० कोटी रुपये इतकी आहे. त्यात ७० टक्के म्हणजे १४७० कोटींचा हिस्सा जागतिक बँकेच्या कर्जाच्या माध्यमांमधून उभारला जाणार आहे. तसेच २७ टक्के म्हणजे ५६० कोटींचा हिस्सा राज्य सरकारच्या स्वनिधीचा राहणार आहे. २०२७ पर्यंत चालणाऱ्या या प्रकल्पासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) २३१ प्रकल्पांना अनुदान देण्यास मान्यता मिळाली. मात्र मनुष्यबळ मिळत नव्हते.

‘‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेत स्मार्टमधील रखडलेल्या मुद्यांचा काही दिवसांपूर्वी आढावा घेतला होता. मनुष्यबळ नसल्याने प्रकल्पाची पीछेहाट होत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे कृषी विभागातील मनुष्यबळ तत्काळ स्मार्टकडे वर्ग करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे बदल्यांचे अधिकार कृषी आयुक्तांना दिले. तसा शासन निर्णयदेखील ताबडतोब जारी केला गेला. यानंतर कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी ९१ अधिकाऱ्यांची स्मार्टकडे बदली केली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्मार्टचे प्रकल्प संचालकपद कृषी आयुक्तांकडे, तर अतिरिक्त संचालकपद आत्माचे विद्यमान संचालक डॉ. दशरथ तांभाळे यांच्याकडे आहे. दोघेही अधिकारी विविध समस्यांमधून वाट काढत स्मार्टला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मुख्य मुद्दा मनुष्यबळाचा होता. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यामुळे आता स्मार्ट प्रकल्पाचा चालना मिळेल व त्याचा लाभ राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या व समूह शेतीमधील गटांना मोठ्या प्रमाणात होईल, असे सांगण्यात आले.

‘स्मार्ट’ला मिळणार १८ एसएओ

स्मार्टसाठी १८ पदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) दर्जाची रिक्त आहेत. कृषी विभागातील एसएओंच्या पदोन्नत्या रखडल्यामुळे स्मार्टला देखील अधिकारी मिळालेले नाहीत. पदोन्नत्या होताच स्मार्टकरीता नवे १८ एसएओ मिळतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय सहसंचालक दर्जाचा एक स्वतंत्र अधिकारी स्मार्टला मिळणार असून, ‘आत्मा’चे संचालक या प्रकल्पावर देखरेख ठेवणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT