Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : 'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही' ; अजित पवारांच्या मागणीला मुख्यमंत्र्याचं उत्तर

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी (Crop Damage Compensation) विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे.

अजित पवार म्हणाले की, काल झालेल्या गारपीटीमुळे गालीचा पसरावा असा बर्फाचा थरच्या थर पडल्याचे चित्र राज्याच्या विविध भागात पाहायला मिळाले.

अवकाळीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फळपिकांची वाट लागली आहे. तसंच आठवडाभर कुठे ना कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून मदत केली पाहिजे. हाततोंडाशी आलेलं शेतकऱ्यांचं पीक गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाला, असा उद्विग्न सवालही पवार यांनी सरकारला केला.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपामुळे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी त्याठिकाणी जात नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की, सरकारने ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नाशिक आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात मी चर्चा केली असून जिल्हाधिकारी स्वत: त्याठिकाणी पंचनामे करत आहेत.

गेल्या आठवड्यातील नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत. तसेच कालच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे स्वत: जिल्हाधिकारी करत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

सगळे नियम निकष डावलून शेतकऱ्यांना यापूर्वीही मदत केली असून आजही आपण मदत करत आहोत. शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी आत्महत्यासंदर्भातील वक्तव्यावर अजित पवार यांनी टीका करत धारेवर धरले.

सत्तार यांनी स्वत:च्या सिल्लोड मतदारसंघात शेतकरी आत्महत्यांविषयी काळीज उलटे करायला नको होते.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान झालेले नाही, असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे मुख्यमंत्री कोणाचाही फोन उचलतात, असे व्हिडीओ फिरतात.

मात्र, त्यांचे वाचाळ मंत्री आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात. असा घणाघातही पवार यांनी यावेळी सत्तार यांच्यावर केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT