Chana  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Crop : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गोळेगावात हरभरा पीक प्रात्यक्षिक

गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे हरभरा या पिकामध्ये मातीपरीक्षण आधारित खत व्यवस्थापन व जस्ताचा वापर या विषयी शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शक पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Team Agrowon

Aurangabad News औरंगाबाद : गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या (MGm KVK) वतीने गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे हरभरा (Chana Crop) या पिकामध्ये मातीपरीक्षण (Soil Test) आधारित खत व्यवस्थापन (Fertilizer Management) व जस्ताचा वापर या विषयी शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शक पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्या अनुषंगाने नुकताच शेतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रक्षेत्र भेटीने झाली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान हरभरा पीक प्रात्यक्षिकास उपस्थित शेतकऱ्यांनी भेट दिली.

त्यानंतर स्वप्नील वाघ, विषय विशेषज्ञ (मृद्‍ विज्ञान) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जस्ताची कार्य, कमतरतेची लक्षणे व माती परीक्षणाचे महत्त्व या विषयी माहिती दिली.

तर तुषार चव्हाण, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी हरभरा या पिकामध्ये सद्यःस्थितीत करावयाची उपाययोजना या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे शेतावरील घेतलेल्या तंत्रज्ञानाबद्दलचे अनुभव सांगितले. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT