Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : नागपुरातील ३७ गावांत ६९ वनराई बंधाऱ्यांची साखळी

पंचायत समितीचा उपक्रम; लोकसहभागातून श्रमदान

Team Agrowon

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून श्रमदानाने तालुक्यातील ३७ गावांलगत असलेल्या ओढ्यांवर ६९ वनराई बंधारे बांधकाम करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखडे यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी दीपक गरुड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीच्या कृषी विभागाने रामपुरी व मंगसा येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग मिळवून येथील गावालगतच्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखडे, प्रीती गाढे, कृषी विस्तार अधिकारी दिनेश खोपे, तांत्रिक सहायक सूरज शेंडे, रोजगार सेवक सचिन डबले, प्रवीण धमदे, विजय राहाटे, मंगसा येथील ग्रामसेवक अरुण देशभ्रतार व रामपुरी येथील ग्रामसेवक दत्तहरी चरटे उपस्थित होते.

या गावांत होणार वनराई बंधारे

सिरोंजी, सर्रा, सोनपूर, मंगसा, महारकुंड, नागलवाडी, पाटणसावंगी, गडेगाव, टाकळी, बडेगाव, जलालखेडा, खुबाळा, बिछवा, चांपा, सावरमेंढा, इसापूर, सावंगी हेटी, तेलंगखेडी, पटकाखेडी, पंढरी, खरडुका, गडमी, गुमगाव, वाकोडी, केळवद, गोसेवाडी, मानेगाव, ब्रह्मपुरी, पिपळा नांदुरी, माळेगाव जोगा, जोधपूर, माळेगाव टाऊन, जोगा, खैरी ढालगाव, किरणापूर आदी गावांमध्ये एकूण ६९ वनराई बंधारे बांधले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT