Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Orange Import : संत्रा आयात शुल्कप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा

Devendra Bhuyar : नागपुरी संत्र्याचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने संत्रा आयात शुल्कात वाढ केली आहे.

Team Agrowon

Amravati News : नागपुरी संत्र्याचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने संत्रा आयात शुल्कात वाढ केली आहे. याचा परिणाम देशांतर्गत संत्रा दरावर होणार असल्याने याची दखल घेत केंद्र सरकारने हस्तक्षेप करीत ही आयात शुल्क वाढ मागे घेण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न करावे, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना गुरुवारी (ता. २२) पाठविलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे.

पत्रानुसार, विदर्भातील मोर्शी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्‍वर या भागांत मोठ्या प्रमाणावर नागपुरी संत्र्याचे लागवड क्षेत्र आहे. या भागात उत्पादित एकूण संत्रा फळांपैकी ३५ टक्‍के संत्र्याची निर्यात बांगलादेशला केली जाते. यापूर्वी विदर्भातून सुमारे २०० ट्रक संत्रा निर्यात होत होती.

एका ट्रकमध्ये सरासरी २५ ते २७ टन इतका संत्रा राहतो. गेल्या वर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्र्याची निर्यात करण्यात येत होता. अमरावती जिल्हयात दीड लाख टन संत्र उत्पादन होते. त्यातील ७८ हजार टन संत्र्याची निर्यात एकट्या बांगलादेशला केली जाते.

मात्र या वर्षी बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केली असून, २५ रुपये इतक्‍या वाढीमुळे आयात शुल्क प्रति किलो ८८ रुपयांवर पोहोचले आहे. याचा परिणाम नागपुरी संत्र्याच्या निर्यातीवर होणार आहे. शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ शोधावी लागेल. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने याप्रश्‍नी बांगलादेश सरकारसोबत चर्चा करून याप्रश्‍नी तोडगा काढत संत्रा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या नागपुरी संत्रा फळावर गेल्या चार वर्षांत ७० टक्‍के इतका आयात कर बांगलादेशने वाढविला आहे. याबाबत केंद्र सरकारसोबत सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला जात आहे. परंतु याप्रकरणी अद्यापही तोडगा काढण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब आहे. संत्रा उत्पादकांचे हित लक्षात घेता याप्रश्‍नी केंद्राने बांगलादेश सरकारसोबत चर्चा करावी.

- देवेंद्र भुयार, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT