Bharat Dal agrowon
ताज्या बातम्या

Bharat Dal : आता डाळींच्या किंमतीवर नियंत्रण, केंद्राकडून ‘भारत दाल’ बाजारात येणार

Bharat Dal Central Government : सरकारने चणाडाळ ‘भारत दाल’ या नावाने बाजारात कमी किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Bharat Dal Brand : कांदा आणि टोमॅटोच्या वाढत्या किमतींनंतर आता सरकार डाळींच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात चणाडाळ सवलतीच्या दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने चणाडाळ ‘भारत दाल’ या नावाने बाजारात कमी किमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकार ६० रुपये किलो दराने हरभरा डाळ विकणार आहे. तर ३० किलोच्या बॅगला ५५ रुपये प्रति किलो दराने विकणार असल्याची माहिती देण्यात आली.

दिल्ली-एनसीआरमध्ये नाफेडकडून चणा डाळ कमी दरात विकली जात आहे. याशिवाय NCCF, केंद्रीय भंडार आणि मदर डेअरीच्या केंद्रांवरही भारत दाल विकली जात असल्याची माहिती देण्यात आली.

याबाबत माहिती देताना केंद्रीय ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, देशात स्वस्त चणा डाळ 'भारत दाल' या ब्रँड अंतर्गत विकली जाणार आहे. यामध्ये सरकार सर्वसामान्यांना स्वस्त दरात हरभरा डाळ देणार आहे.

या डाळीची देशभरातील ७०३ नाफेड स्टोअरमध्ये विक्री केली जाणार आहे. सोबत पडून राहिलेल्या हरभऱ्याच्या साठ्याचे हरभरा डाळीत रूपांतर करून ग्राहकांना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

हरभरा मोठ्या प्रमाणात वापरला जातो

चणा डाळ ही भारतातील सर्वाधिक उत्पादित डाळ आहे. लोक सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत चणाडाळीचा वापर करतात. याशिवाय या डाळीतून बेसन तयार केले जाते, त्याचा वापर फराळ आणि मिठाई बनवण्यासाठी केला जातो. अशा स्थितीत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वच राज्यांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

विशेष म्हणजे चणाडाळीपूर्वी टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता सरकारने टोमॅटो स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये स्वस्त टोमॅटो विकले जात आहेत. त्याचबरोबर नाफेडही बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये अनुदानित दराने टोमॅटोची विक्री करत असल्याची माहिती गोयल यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT