Cotton Market Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Market : ‘सीसीआय’ची कलदगावात कापूस खरेदी; आठ हजार दर

भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) कडून सालासर कॉटन प्रायव्हेट लिमिटेड भोकर फाटा (कलदगाव) येथे खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदीचा प्रारंभ मंगळवारी (ता.२०) झाला.

Team Agrowon

नांदेड : भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) कडून सालासर कॉटन प्रायव्हेट लिमिटेड भोकर फाटा (कलदगाव) येथे खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदीचा प्रारंभ मंगळवारी (ता.२०) झाला.

सध्या बाजारात कपाशीला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) खुल्या बाजारात कपाशी खरेदीत उतरला आहे. या खरेदीस प्रारंभ मंगळवारी झाला. या वेळी केंद्र प्रभारी महेंद्रपालसिंग यादव, नांदेड बाजार समितीचे सचिव वामनराव पवार, सालासर कॉटस्पिन्स मालक नरेश गोएंका, श्रीराम मेडेवार, नंदू महाजन, मार्केट कमिटीचे सहसचिव भारसावडे आदी उपस्थित होते. या वेळी मुहूर्तावर शेतकऱ्याच्या कपाशीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपये दर मिळाल्याची माहिती पवार यांनी दिली.

शेतकऱ्यांनी आपली कपाशी खासगी व्यापाऱ्यांना न देता ‘सीसीआय’ला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दत्ता नादरे, एकनाथ मोगरकर, धम्मपाल सरोदे, बालाजी गव्हाणे, संतोष कपाटे, शेतकरी शंकर राजेगोरे, शेख मुस्तफा, व्यंकटी खांढरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT