Cashew Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Crop Damage : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा काजू पिकाला फटका

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागांत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्याचा काजू पिकाला मोठा फटका बसला आहे. वाऱ्यामुळे काजूची कोवळी बी आणि मोहोर गळून पडला आहे.

Team Agrowon

Cashew Crop Damage सिंधुदुर्गनगरी ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागांत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्याचा काजू पिकाला मोठा (Cashew Crop) फटका बसला आहे.

वाऱ्यामुळे काजूची कोवळी बी आणि मोहोर गळून पडला आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील अनेक गावांमध्ये हा प्रकार घडला आहे. बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात काजू हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अनेक भागांत अजूनही काजू हंगाम सुरू झालेला नाही. बहुतांश ठिकाणी काजूवर मोहोर आणि कोवळी काजू बी दिसून येत आहे.

दोडामार्ग, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये काजू परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पूर्वपट्ट्यात काही दिवस उशिराने काजू बी तयार होतात. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहे.

जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात या वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. पहाटे तीन-चार वाजल्यापासून जोरदार वारे सुरू होतात. गेले दोन दिवस या वाऱ्यांनी हैराण केले आहे.

काजू पिकाला त्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. झाडावरील कोवळी काजू बी आणि मोहोर, झाडांची पाने गळून पडली आहेत.

झाडांखाली हिरव्या पानांचा खच साचला आहे. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. पूर्वपट्ट्यात काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

त्या तुलनेत किनारपट्टी भागात नुकसानीची तीव्रता कमी आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी (ता. ४) सकाळपासून वाऱ्याचा वेग काहीसा कमी झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT