Seed  Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed : सहा बियाणे कंपन्यांविरोधात खटले

Illegal Agriculture Inputs : त्यानुसार ४१ प्रकारचे बियाणे सदोष आढळल्याने सहा बियाणे कंपन्या व कृषी केंद्रधारकांविरोधात न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Wardha News : कृषी विभागाच्या भरारी पथकाने अनधिकृत निविष्ठांच्या विक्रीवर प्रतिबंधासाठी पावले उचलली होती. त्यानुसार ४१ प्रकारचे बियाणे सदोष आढळल्याने सहा बियाणे कंपन्या व कृषी केंद्रधारकांविरोधात न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ९ भरारी पथकांनी यंदाच्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी निविष्ठांचे नमुने घेत ते प्रयोगशाळेकडे पाठविले. अहवालाअंती बियाण्यांचे ४१, रासायनिक खते १५ आणि कीटकनाशकांचे सहा नमुने सदोष आढळले. त्याआधारे ७ लाख ३३ हजार कृषी निविष्ठा विक्री बंदचे आदेश देण्यात आले. त्यासोबतच सहा बियाणे कंपन्यांविरोधात न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण १ हजार २९२ कृषी सेवा केंद्र आहेत. आतापर्यंत १ हजार २२७ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४२१ बियाण्यांचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यापैकी ४१ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यात १५ न्यायालयीन खटला व २६ ताकीदपात्र असल्याने ४१ ही बियाणे कंपन्या व कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्यातील सहा कंपन्या व कृषी सेवा केंद्र धारकांविरोधा न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला आहे. उर्वरित ९ जणांविरोधातही खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अप्रमाणित १७ लाख ५८ हजार रुपयांच्या ४१ बियाण्यांच्या विक्री बंदचे आदेश देण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कीटकनाशकाची विक्री करणाऱ्या १ हजार ११० केंद्रांची तपासणी करण्यात आली. ७७ नमुने तपासण्यात आले. त्यातील सहा नमुने सदोष आढळल्याने विक्रेते व कंपन्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये ११ लाख ८२ हजर रुपयांच्या कीटकनाशक विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

२२९ पैकी १५ खतांचे नमुने अप्रमाणित

रासायनिक खताचे २२९ नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यातील १५ अप्रमाणित आढळून आले. त्यासंदर्भाने कृषी केंद्र व कंपन्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अप्रमाणित खताच्या १ हजार ७७५ बॅग्जची विक्री बंद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT