Cotton Market Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Market : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास गुजरातमधून अटक

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी राजू पाटील या व्यापाऱ्यास सुमारे एक कोटी रुपयांचा कापूस दिला होता. पेमेंट आठ दिवसांत देतो, असे सांगून तो फरारी झाला होता.

Team Agrowon

पाचोरा, जि. जळगाव ः पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिसांनी शेतकऱ्यांचा कापूस (Cotton) घेऊन त्यांचे पैसे न देता फसवणूक (Froud With Farmer) करणाऱ्या राजू पाटील (रा. वाडी, ता. पाचोरा) या व्यापाऱ्यास वर्षभरानंतर ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी राजू पाटील या व्यापाऱ्यास सुमारे एक कोटी रुपयांचा कापूस दिला होता. पेमेंट आठ दिवसांत देतो, असे सांगून तो फरारी झाला होता. परंतु पैसे मिळत नसल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व उपनिरीक्षक अमोल पवार यांना सर्व प्रकार सांगितला.

फसवणूक रकमेचा आकडा मोठा असल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांना सांगितले. वरिष्ठांचे आदेश व शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार तपास पथके नेमण्यात आली.

जितेंद्र पाटील व मुकेश लोकरे यांच्या पथकाने सर्व माहिती जमा केली, मोबाईल रेकॉर्ड काढले. संशयित व्यापारी गुजरातला असल्याचे कळाल्याने त्यांनी गुजरात गाठले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित शिताफीने पकडले. त्यास पाच दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Deficit: पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

Crop Demonstration Survey: इंद्रायणी भात पीक प्रात्यक्षिकाची पाहणी

Indigenous Cattle Conservation: देशी गोवंश संवर्धनासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना

Artificial Rain: पावसाने दडी मारलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करा : खा. प्रतापराव जाधव

Land Titling Act: निश्‍चित मालमत्ता प्रमाणपत्रासाठी कायदा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT