ताज्या बातम्या

Flower Farming : गणेशोत्सवासाठी बहरले फुलांचे मळे

Ganesh Festival 2023 : मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, गणेशोत्सवाची चाहूल लागल्यामुळे शेवंती व झेंडूच्या फुलांना मागणी वाढल्याने भावात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यात विविध रंगाच्या शेवंती व झेंडूच्या फुलांचे बहरलेले मळे लक्ष वेधून घेत आहेत. मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, गणेशोत्सवाची चाहूल लागल्यामुळे शेवंती व झेंडूच्या फुलांना मागणी वाढल्याने भावात वाढ झाली आहे. यामुळे फुले उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गणराया यावर्षी पावणार असल्याची भावना फूल उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तालुक्यात नारायणगाव, कुसूर, निमदरी या भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेवंती, झेंडू या फुलांची ठिबक, मल्चिंग आदीचा वापर करून आधुनिक पद्धतीने लागवड करतात.

सणासुदीच्या कालावधीत फुलांना वाढीव भाव मिळत असल्याने बागायती भागातील शेतकरी फूल शेतीकडे आकर्षित झाले आहेत. रोपांच्या लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांत शेवंतीच्या फुलांचा तोडणी हंगाम सुरू होतो.

श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा या कालावधीत फुलांना वाढीव भाव मिळत असल्याचा अनुभव असल्याने शेतकरी फूल शेतीच्या लागवडीचे नियोजन करतात. पाऊस झाल्यास झेंडूच्या फुलांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन फुले खराब होतात.

यामुळे या भागातील शेतकरी पावसाळ्यात झेंडूच्या तुलनेत शेवंतीच्या लागवडीला प्राधान्य देतात. फुलांचा विविध रंग असलेल्या शेवंतीच्या संकरित जाती विकसित झाल्याने व फुले टिकाऊ असल्याने इतर फुलांच्या तुलनेत हार व सजावटीसाठी शेवंतीच्या फुलांना जास्त मागणी असते.

दोन दिवसांपासून भाव वाढले

मागील दोन दिवसांपासून फुलांची भाव वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी प्रतवारी व रंगानुसार शेवंतीच्या फुलांची प्रति किलोग्रॅम ३० ते ५० रुपये तर झेंडूच्या फुलांची २० ते ४० रुपये या बाजारभावाने खरेदी केली. बाजारभावात सुमारे दुप्पट वाढ झाली आहे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

एकरी दीड लाख रुपये खर्च करून शेवंतीची लागवड केली आहे. फुलांचा तोडणी हंगाम बहरात आहे. मागील एक महिना भाव नसल्याने चिंता वाढली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून भाव वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गणेश उत्सव काळात अजून भाव वाढतील अशी अपेक्षा आहे.
— सुरेंद्र दुराफे, शेवंती उत्पादक, कुसूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT