APMC Election  Agrowon
ताज्या बातम्या

Kandhar APMC : कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची बाजी

APMC Election : नांदेड जिल्ह्यात कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार श्यामसुंदर शिंदे या दोन गटात चुरशीची लढाई झाली. यात चिखलीकरांनी बाजी मारली.

Team Agrowon

Nanded News : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत खासदार प्रताप पाटील-चिखलीकरप्रणित बळीराजा परिवर्तन पॅनेलने बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केले. १८ पैकी दहा जागा जिंकून चिखलीकर गटाने या निवडणुकीत आपला ठसा उमटविला आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा बळीराजा परिवर्तन पॅनेल, कॉंग्रेस आणि शेकाप यांचा शेतकरी विकास पॅनेल आणि बीआरएस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेड, असे तीन पॅनेल निवडणुकीत आमनेसामने होते. चिखलीकर व शिंदे या दाजी-भाऊजीप्रणित पॅनेलमध्ये ही निवडणूक झाली. यात चिखलीकर समर्थकांनी बाजी मारली. शेकाप- कॉंग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनेलला सात, तर बीआरएसप्रणित तिसऱ्या पॅनेलला एक जागा मिळाली.

विजयी उमेदवार असे...

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात भाजप समर्थक उमेदवार शाहूराज गोरे,  शंकर पाटील, व्यंकटी पांढरे, कांशीराम वरपडे, शेकाप व कॉंग्रेस समर्थक गट- रोहित शिंदे, रमाकांत जोगदंड, ज्ञानेश्वर चोंडे, सेवा सहकारी संस्था महिला- शेकाप- कॉंग्रेस गटातील विजयी- पुष्पा खुडे, जनाबाई नाकाडे, सेवा सहकारी इतर मागासवर्गीय गटातील भाजप समर्थक सुभाष देशमुख, सेवा सहकारी भटक्या जाती बालाजी झुंबाड, व्यापारी मतदारसंघ भाजप समर्थक शैलेश बोरलेपवार, शेकाप-कॉंग्रेस समर्थक गिरीश मामडे, ग्रामपंचायत मतदारसंघात भाजप समर्थक सुधाकर कौसल्ये, शेकाप-कॉंग्रेस समर्थक चंद्रकांत पेठकर, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघात भाजप समर्थक मारोती पंढरे, ग्रामपंचायत अनु.जाती मतदारसंघात भाजप समर्थक नारायण गायकवाड, हमाल मतदारसंघात बीआरएस समर्थक भागवत कांबळे हे १८ जण विजयी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT