Govind Dairy Agrowon
ताज्या बातम्या

Biogas Plant : गोविंद डेअरीतर्फे बायोगॅस संयंत्र

गोविंद डेअरीच्या सभासदांना सिस्टिमा बायो कंपनीने बनविलेल्या बायोगॅस संयंत्रासोबत दोन बर्नरची उत्कृष्ट शेगडी, स्वयंपाकासाठी गॅस आणि दर्जेदार सेंद्रिय खत उपलब्ध होणार आहे.

टीम ॲग्रोवन

फलटण (जि. सातारा) ः गोविंद डेअरीच्या (Govind dairy) सभासदांना सिस्टिमा बायो कंपनीने (Systema Bio Company) बनविलेल्या बायोगॅस संयंत्रासोबत (Bio Gas Plant) दोन बर्नरची उत्कृष्ट शेगडी, स्वयंपाकासाठी गॅस आणि दर्जेदार सेंद्रिय खत (Organic Fertilizer) उपलब्ध होणार आहे. डेअरीने राबविलेल्या विशेष योजनेमध्ये हे संयंत्र बसविण्यासाठी पाच हजार रुपये खर्च आहे, अशी माहिती गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

मानेवाडी (ता. फलटण) येथे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिस्टिमा बायो यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित ग्रीन गोविंद बायोगॅस संयंत्र पुरवठा योजनेच्या शुभारंभप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी सिस्टिमा बायोच्या डायरेक्टर जुनाक्षी क्रूज, सिस्टिमा बायोच्या पीपल हेड डायरेक्टर सेसील पॉम्पी, कमर्शिअल डायरेक्टर अतुल मित्तल, गोविंदचे व्यवस्थापकीय संचालक धरमिंदर भल्ला, गोविंदचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर आणि चंद्रशेखर जगताप यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

अतुल मित्तल यांनी ग्रीन गोविंद बायोगॅस संयंत्र पुरवठा योजनेचे स्वरूप आणि विविध फायद्याबाबत माहिती दिली. गोविंद डेअरी आणि कंपनीमध्ये झालेल्या करारामुळे हे बायोगॅस संयंत्र सभासदांना दोन बर्नर शेगडीसह पाच हजार रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोविंद फाउंडेशनचे डॉ. शांताराम गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत करून शेतकऱ्यांना डेअरीच्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Update: अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाची ५० टक्के पेरणी

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीत प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा

Crop Damage Compensation: नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Rainfall Deficit Impacts: नांदेडला पावसाच्या भरवशावर केलेली पेरणी धोक्यात

Kharif Sowing Update: उत्तर सोलापुरात केवळ हजार हेक्टरवर पेरणी

SCROLL FOR NEXT