Sugarcane Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Factory : 'भीमाशंकर कारखान्याचे वजन काटे बिनचूक'

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुण्याच्या वैधमापन भरारी पथकाचे प्रमुख संजीव कवरे व वैधमापन जुन्नर विभाग निरीक्षक प्रदीप बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट देऊन भीमाशंकर कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली.

Team Agrowon

पारगाव : दत्तात्रेयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे (Bhimashankar Co-operative Sugar Factory) वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजन काटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी अहवालात दिला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुण्याच्या वैधमापन भरारी पथकाचे प्रमुख संजीव कवरे व वैधमापन जुन्नर विभाग निरीक्षक प्रदीप बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट देऊन भीमाशंकर कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली.

या वेळी उसाने भरलेले ट्रक व बैलगाड्यांच्या वजनाची कसून तपासणी केली. उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असल्याची शहानिशा केली.

यावेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. या बाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला. वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाने दिला. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार व वाहन चालक आदी उपस्थित होते.

बेंडे म्हणाले, ‘‘माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचे हित सदैव डोळ्यासमोर ठेवून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालविला जातो. ऊस उत्पादकांचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे.’’

कारखान्याचे सर्व वजन काटे हे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या वजनाची खात्री करण्यासाठी नेहमी खुले ठेवले आहेत. येथे नेहमीच पारदर्शक पद्धतीने काम केले जाते. भरारी पथकाच्या तपासणीनंतर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली.
बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर साखर कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT