Namo Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Namo Farmers Scheme : ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा लाभ लवकरच

Agriculture Scheme : ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम-किसान योजनेच्या वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्यामार्फत वितरित कण्यात येईल.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ह‍ी योजना २०२३-२४ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम-किसान योजनेच्या वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्यामार्फत वितरित कण्यात येईल.

यामध्ये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च प्रति हप्ता २००० प्रमाणे लाभ वितरित करण्यात येईल. या योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.

तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तत्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनादेखील लागू होतील. पी.एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थीदेखील या योजनेचे लाभार्थी राहतील, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT