Loan Waive Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Incentive Subsidy : नियमित कर्ज फेडणाऱ्या सोळा हजारांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ राज्य शासन देणार आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच नियमित कर्जफेड (Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा (Farmer Incentive Subsidy Scheme) लाभ राज्य शासन देणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. त्यात जिल्हा बँकेने अपलोड केलेल्या शेतकरी यादीनुसार पहिल्या टप्प्यात १६ हजार ६७९ पात्र शेतकऱ्यांची यादी जळगाव जिल्हा सहकार विभागास उपलब्ध झाली आहे.

केंद्र सरकारप्रमाणेच तत्कालीन फडणवीस शासनाने २०१७-१८ मध्ये जळगाव जिल्ह्यातील नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या सुमारे एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना १०५ कोटी रुपये प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला होता. २०१९ नंतरच्या सत्तारूढ महाविकास आघाडी शासनाने कर्जमाफीसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले. अर्थसंकल्पात जाहीर करूनही प्रोत्साहन योजनेसाठी आर्थिक तरतूदच नसल्याने तीन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला प्रोत्साहनाची पानेच पुसली होती.

जून २०२२ अखेर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबरअखेर प्रोत्साहन योजनेंतर्गत लाभ देण्याचे जाहीर केले होते. शासन निर्देशानुसार जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या होत्या. या याद्यांची पडताळणी सहकार विभागाकडून करण्यात आली असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या २०१९ मधील पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रोत्साहन लाभ देण्यात येणार, असल्याचे बिडवई यांनी सांगितले.

चार लाख शेतकऱ्यांना बारावा हप्ता

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांत वार्षिक सहा हजार रुपये नोंदणी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर डीबीटीद्वारे लाभ दिला जातो. त्यानुसार बारावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार लाख ७४ हजार शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी झालेली आहे. त्यांपैकी अद्याप ३४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी नोंदणी अद्ययावत करणे बाकी आहे. ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नोंदणीनुसार बाराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

तालुकानिहाय अनुदानास पात्र शेतकरी

तालुका शेतकरी

जळगाव १ हजार २९३,

अमळनेर २ हजार २३८

भडगाव ९१५

भुसावळ ९४२

बोदवड ३०२

चाळीसगाव १ हजार ३३१

चोपडा १ हजार २८४

धरणगाव १ हजार ७८९

तालुका शेतकरी

एरंडोल हजार ४३०

जामनेर ८११

मुक्ताईनगर १९३

पाचोरा १ हजार २८९

पारोळा १ हजार ५१४

रावेर ३४५

यावल ९८३

एकूण ः १६ हजार ६७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT