PM Kisan Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

PM Kisan Scheme : लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही हप्ता मिळेना

पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर दिली जाते.

Team Agrowon

नाशिक ः पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM-Kisan Samman Nidhi Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर दिली जाते. मात्र, सटाणा तालुक्यांतील काही लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता अचानक बंद झाला आहे.

खातेदारांचे के. वाय. सी. प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा एकही हफ्ता मिळत नाही. याबाबत लाभार्थ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील (Jitendra Ingale Patil) यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधले आहे.

सटाणा तालुक्यांतील पीएम-किसान योजनेअंतर्गत २ हजार खात्यात जमा होत नाही किंवा जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांनी थेट याप्रकरणी निवेदन देत तक्रार केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की योजनेचे लाभ सुरळीत मिळत असताना अचानक लाभ बंद झाले. तर काही खातेदारांचे हफ्ते परस्पर कर्जखात्यात जमा होत आहेत. खातेदारांचे के. वाय. सी. प्रक्रिया पूर्ण करून हि एकही हप्ता मिळत नाही.

काही खातेदार हयात असूनही मृत दाखवलेले आहेत. त्यांचे सर्व कागदपत्र पूर्तता करूनही हफ्ता मिळत नाही. तसेच पोस्टात खाते उघडूनही हफ्ता जमा होत नाही. त्यापूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे जमा व्हायचे, अशा तक्रारी लाभार्थ्यांनी निवेदन देत केल्या आहे.

निवेदनावर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, भूषण कापडणीस, दिलीप  नंदन, मधुकर नंदन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ई-केवायसी हे बंधनकारक
याबाबत तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले, की बागलाण तालुक्याने जिल्ह्यांत सर्वाधिक ९३ टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ७ टक्के शेतकरी अद्याप बाकी आहेत.

मात्र त्यांना वेळोवेळी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. मात्र अनेकांनी दुर्लक्ष केल्याने काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत.

भूमी अभिलेख नोंदी व ई-केवायसी हे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी प्रक्रिया वेळेवर ते पूर्ण करून घ्यावी, काही अडचणी असल्यास प्रत्येकाला सहकार्य करण्यात येईल. एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे एका कुटुंबात दुसऱ्या व्यक्तीला लाभ घेता येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT