Beekeeping Agrowon
ताज्या बातम्या

Bee Keeping : बसवंत हनी बी पार्क ‘वसुंधरा मित्र संस्था’ पुरस्काराने सन्मानित

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ‘बसवंत हनी बी पार्क’ या मधमाशी संबंधित कार्य करणाऱ्या संस्थेला ‘वसुंधरा मित्र संस्था’ पुरस्काराने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ‘बसवंत हनी बी पार्क’ (Basvant Honey Bee Park) या मधमाशी संबंधित कार्य करणाऱ्या संस्थेला ‘वसुंधरा मित्र संस्था’ (Vasundhara mitra Sanstha) पुरस्काराने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार बसवंत बी पार्कचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना महोत्सवाचे अध्यक्ष आर.आर.देशपांडे यांनी प्रदान केला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोमवार (ता. २०) महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी नाशिक येथील गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतन महाविद्यालयात करण्यात आले. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीहरी उपासनी,किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे अध्यक्ष आर.आर. देशपांडे, वीरेंद्र चित्राव, परेश जोशी,राहुल बोरसे उपस्थित होते.

मधमाशांचे निसर्गातील महत्त्व विशद करून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. त्यामुळे या कार्याचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला आहे.

‘हनी बी पार्क’ येथे वर्षभर पर्यटन महोत्सव,राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद यांसह इतर अनेक उपक्रम राबविले जातात. या शेतीपूरक तसेच पर्यावरणस्नेही अभ्यास-प्रकल्पाला पर्यटकांचा दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता बसवंत हनी बी पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT